विशेष

विज्ञानाचा आनंद लुटा; पद्मश्री अरविंद गुप्ता यांची विशेष कार्यशाळा १८ मे रोजी

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: टाकाऊ वस्तूंमधून विज्ञानाची गमंत उलगडत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी एमआयडीसी एज्यूस्पार्कतर्फे विशेष विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मश्री अरविंद गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळणार असल्याचे प्रा. डॉ. नितीन घावटे यांनी सांगितले.

रांजणगाव एमआयडीसी स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे सोमवारी (दि. १८ मे) सकाळी ११ वाजता ही कार्यशाळा होणार आहे. ‘विज्ञानाचा आनंद लुटा’ या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमात टाकाऊ वस्तूंमधून खेळणी तयार करण्याची कला, विज्ञानातील सोपे प्रयोग आणि ‘हँड्स-ऑन ट्रेनिंग’द्वारे विद्यार्थ्यांना विज्ञान अधिक सुलभ पद्धतीने समजावून सांगितले जाणार आहे.

जगप्रसिद्ध खेळणी संशोधक आणि आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी अरविंद गुप्ता विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार असून विज्ञानातील सर्जनशीलतेचा नवा दृष्टिकोन या कार्यशाळेतून अनुभवता येणार आहे.

एमआयडीसी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, कारेगाव (ता. शिरूर) येथे होणाऱ्या या उपक्रमात कर्मचारी, विद्यार्थी तसेच विज्ञानाची आवड असलेल्या नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button