Uncategorized
पोलिसांची अवैध दारूविरोधात धडक मोहीम; तीन गुन्हे दाखल, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम – 24}: तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायाविरोधात शिरूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून सुमारे १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक मोहिमेमुळे हातभट्टी दारू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ मे रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. पहिल्या कारवाईत टाकळी हाजी हद्दीतील सावळेवाडी परिसरात घोडनदी पात्रालगतच्या काटवणात छापा टाकण्यात आला. यावेळी सुरेश चोरे व संतोष मुंजाळ (रा. डोंगरगण, ता. शिरूर) हे गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून कच्चे रसायन, तयार दारू, केमिकलयुक्त ताडी व इतर साहित्य असा तब्बल १ लाख १३ हजार २७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १२३ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून कच्चे रसायन, तयार दारू, केमिकलयुक्त ताडी व इतर साहित्य असा तब्बल १ लाख १३ हजार २७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १२३ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत कवठेयमाई येथील किनारा हॉटेलसमोर सुभाष पांडुरंग मुंजाळ हा देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकून ट्युबर्ग, बडवायजर, किंगफिशर बिअर तसेच देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
या कारवाईत ४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या कारवाईत ४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.तिसऱ्या कारवाईत मलठण हद्दीतील आर. जी. रेस्टो परमिटरूम बियर बार शेजारी असलेल्या तिरंगा बिर्याणी हॉटेलमधील खोलीवर छापा टाकण्यात आला. येथे सदाशिव रावजी घोडे हा देशी दारूचा अवैध साठा ठेवून विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी विविध कंपनीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून त्यांची किंमत ८ हजार २४० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी विविध कंपनीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून त्यांची किंमत ८ हजार २४० रुपये असल्याचे सांगण्यात आले.या तिन्ही कारवायांमध्ये एकूण चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून १ लाख २५ हजार ६१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग, पोलीस हवालदार सुद्रिक, सांगळे, भवर तसेच पोलीस शिपाई गणेश गोसावी यांनी कारवाईत सहभाग घेतला.
पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग, पोलीस हवालदार सुद्रिक, सांगळे, भवर तसेच पोलीस शिपाई गणेश गोसावी यांनी कारवाईत सहभाग घेतला.अवैध दारू व्यवसाय, हातभट्टी निर्मिती अथवा बेकायदेशीर धंद्यांची माहिती नागरिकांनी तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन शिरूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.