क्राईम
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शहरातील बाबुरावनगर परिसरातील गंगानगर टाटा शोरूमच्या वर्कशॉपमधून विविध वाहनांमधील तब्बल सात बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
असून, चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत २९ हजार ५०० रुपये इतकी आहे.
सकाळी १० ते १७ मे रोजी सकाळी १० या कालावधीत बाबुरावनगर येथील गंगानगर टाटा शोरूम वर्कशॉपमध्ये उभी असलेल्या वाहनांमधील एक्साईड, टाटा ग्रीन व ईस्टमन कंपनीच्या बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.

