Uncategorizedराष्ट्रीयविशेष
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}अध्यात्मिक विचार, गणेशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि निस्वार्थी वृत्ती यामुळे समाजात वेगळी ओळख निर्माण केलेले प्रसिद्ध हलवाई शरद मुसळे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्रीमंत हलवाई चौक गणेश मंडळाच्या वतीने सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अथक परिश्रम, प्रामाणिकपणा, सचोटी आणि शिस्त यांच्या जोरावर त्यांनी व्यवसाय उभारला. ग्राहकांशी आत्मीयतेचे नाते आणि गुणवत्तेची जपणूक यामुळे त्यांनी स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केल्याचे मान्यवरांनी सांगितले.


कार्यक्रमाला हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक काळे, माजी अध्यक्ष अविनाश जाधव, रणजित गायकवाड, शरद परदेशी, बाबूशेठ पुजारी, प्रणव मुसळे, तर्डोबावाडीचे माजी उपसरपंच गणेश खोले,
बांधकाम साहित्य व्यावसायिक अतुल बोथरा, भाजप पदाधिकारी विजय नरके, प्रेम मुसळे आदी उपस्थित होते.
