Uncategorized

वेदपाठक कॉम्पुटर इन्स्टिटयूट ची एमकेसीएल आयोजित ‘पुणे रिजन स्ट्रॅटेजिक ग्रोथ प्लॅन इयर 2026 – रेसिडेन्टयल ट्रैनिंग प्रोग्राम ’ साठी निवड झाली.

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}पुणे विभागातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वेदपाठक  कॉम्पुटर  इन्स्टिटयूट  ची एमकेसीएल आयोजित ‘पुणे  रिजन  स्ट्रॅटेजिक  ग्रोथ  प्लॅन  इयर  2026 – रेसिडेन्टयल  ट्रैनिंग  प्रोग्राम ’ साठी  निवड झाली आहे. संस्थेच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण पद्धती, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम तसेच आधुनिक डिजिटल शिक्षणातील सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

संगणक शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरकेंद्रित मार्गदर्शन, डिजिटल कौशल्यांचा विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रभावी प्रशिक्षण देण्यात संस्थेने विशेष यश मिळविले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी विविध अभिनव उपक्रम राबविण्यावर संस्थेने भर दिला असल्याचे संजय वेदपाठक यांनी सांगितले.

पुणे विभागातील उत्कृष्ट कामगिरीमुळे संस्थेची या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच परिसरातील नागरिकांकडून संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत  आहे.

डेली न्यूज पोस्ट 24 च्या वतीने प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button