Uncategorized
बनावट सोने गहाण ठेवून एचडीएफसी बँकेची १७.७६ लाखांची फसवणूक; १२ जणांविरुद्ध गुन्हा
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}बनावट सोने खरे असल्याचा बनाव करून एचडीएफसी बँकेत गहाण ठेवत गोल्ड लोन उचलून तब्बल १७ लाख ७६ हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार रांजणगाव येथे उघडकीस आला
आहे. या प्रकरणी रांजणगाव पोलिसांनी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत शैलेश लालासाहेब जाधव (वय ३३, रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे एचडीएफसी बँकेशी संबंधित असून बँकेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी हे एचडीएफसी बँकेशी संबंधित असून बँकेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जानेवारी २०२५ ते २८ मार्च २०२५ या कालावधीत रांजणगाव येथील एचडीएफसी बँकेत आरोपींनी बनावट सोने खरे असल्याचे भासवून गोल्ड लोन
घेतले. आरोपी लक्ष्मण उर्फ लखन किसन वीर याच्या सांगण्यावरून आरोपी क्रमांक ३ ते १० यांनी बनावट दागिने बँकेत गहाण ठेवून कर्ज उचलले. या व्यवहारातून बँकेची एकूण १७ लाख ७६ हजार ७०० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
घेतले. आरोपी लक्ष्मण उर्फ लखन किसन वीर याच्या सांगण्यावरून आरोपी क्रमांक ३ ते १० यांनी बनावट दागिने बँकेत गहाण ठेवून कर्ज उचलले. या व्यवहारातून बँकेची एकूण १७ लाख ७६ हजार ७०० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तसेच बँकेकडून नेमण्यात आलेले गोल्ड लोन व्हॅल्युअर संजय हिराचंद पंडित याने संबंधित सोने बनावट असल्याची माहिती असतानाही ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३३६(२), ३३८, ३३६(३), ३४०(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी लक्ष्मण उर्फ लखन किसन वीर (रा. राजापूर, ता. श्रीगोंदा) व मच्छिंद्र दिगंबर खैरनार (रा. संकल्प सिटी, रांजणगाव) यांना २५ मे रोजी रात्री अटक करण्यात आली. यापैकी लक्ष्मण वीर यास २९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून मच्छिंद्र खैरनार याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

यासंदर्भात पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तिडके पुढील तपास करीत आहेत.


