Uncategorized

डेक्कन शाळेची दशकपूर्ती उत्साहात; संस्कारक्षम शिक्षणाच्या वाटचालीचा गौरव

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: बाबुराव नगर येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावा वर्धापन दिन रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्तेसह संस्कारक्षम शिक्षण देत शाळेने गेल्या दशकात शिरूरच्या शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केल्याचा गौरव यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

१४ जून २०१६ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटी शिरूर शाळेच्या इमारतीचे उदघाट्न करण्यात आले होते. त्यानंतरच्या दहा वर्षांत शाळेने शैक्षणिक प्रगतीबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.
वर्धापन दिनानिमित्त सकाळी संस्थेचे संस्थापक राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि महादेव बल्लाळ नामजोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तसेच शाळेच्या वार्षिक अहवालाचेही विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य नाना पोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कर उद्योजक सुरेश भांगे व उद्योजक संजय डांगे उपस्थित होते. याशिवाय स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य व्ही. डी. कुलकर्णी, गणेश मराठे, डॉ. नूतन क्षीरसागर, प्रा. संध्या कुलकर्णी, पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी, सभासद आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुरेश भांगे म्हणाले, “डेक्कन शाळेने विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्कार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असून शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.”
अध्यक्षीय भाषणात नाना पोटे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक परंपरेचा गौरव केला. लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर आणि छत्रपती शाहू महाराज यांसारख्या थोर व्यक्तींच्या विचारांमधून संस्थेची जडणघडण झाल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाबरोबरच संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले.
प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की, सीएसआर योजनेअंतर्गत दिल्ली येथील ‘युवा अनस्टॉपेबल’ संस्थेच्या सहकार्याने सुमारे २५ लाख रुपये खर्चून अत्याधुनिक स्टेम लॅब उभारण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अमोल वाघमारे यांनी केले.प्रतिभा सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button