महाराष्ट्र
शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}: स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया, वाढीव वीजबिले तसेच वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित समस्यांविरोधात शिरूर वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. १५) सकाळी १० वाजता महावितरण कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच बिलातील तफावत, तांत्रिक अडचणी आणि ग्राहकांच्या विविध तक्रारींबाबतही असंतोष व्यक्त केला जात आहे.
मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे प्रवीण गायकवाड यांनी केले आहे.




