शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलिसांकडून उद्या, बुधवार (दि. २ सप्टेंबर) दुपारी १२ वाजता महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले व पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शिरूर पोलीस स्टेशन, बसस्थानकाजवळ ही बैठक होणार आहे. गणेशोत्सव संदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे.
या बैठकीस नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे उपस्थित. राहणार असून नगरसेवक-नगरसेविका, पत्रकार, शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य तसेच शहरातील गणेश मंडळांचे अध्यक्ष यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिरूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.