शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: आर्थिक व्यवहारांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने शिरूर नगरपरिषद आणि शिरूर रिक्रिएशन क्लब अँड लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुक्तद्वार वाचनालय’ अंतर्गत आर्थिक जागरूकता व साक्षरता या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे व्याख्यान बुधवार, २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शिरूर नगरपरिषद ग्रंथालय इमारत, महात्मा गांधी रोड, रामआळी, शिरूर येथे होणार आहे. उद्योजकता विकास तज्ज्ञ प्रा. हेमंत नामदेव भागवत हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. सुभाष प्रतापराव पवार राहणार आहेत.
आर्थिक नियोजन, गुंतवणूक, बचत तसेच आर्थिक व्यवहारांबाबत योग्य माहिती नागरिकांना मिळावी, या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.