राष्ट्रीय

शिरूर शहराच्या मतदारयादीत मोठी घट; तब्बल ७,८९८ मतदार वगळले

एसआयआरनुसार प्रारूप यादी जाहीर; ३२,३९७ वरून मतदारसंख्या २४,४९९ वर

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}मतदारयादीच्या सखोल निरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) शिरूर नगरपालिकेची प्रारूप मतदारयादी जाहीर करण्यात आली असून, या यादीत तब्बल ७,८९८ मतदारांची घट झाल्याचे समोर आले आहे. यामुळे यापूर्वी ३२,३९७ असलेली शिरूर शहराची मतदारसंख्या आता २४,४९९ झाली आहे. मतदारयादीतील ही मोठी घट चर्चेचा विषय ठरली आहे.

प्रारूप मतदारयादीनुसार शिरूर नगरपालिकेच्या हद्दीत ११,९७० पुरुष, १२,५२८ महिला आणि अन्य प्रवर्गातील एका मतदाराचा समावेश आहे.

एसआयआरच्या प्रक्रियेत मतदारयादीची तपासणी केल्यानंतर विविध कारणांमुळे मतदार वगळण्यात आले आहेत. त्यामध्ये १,२२५ मृत मतदार, २,२१७ स्थलांतरित मतदार, ६४१ दुबार मतदार, तर ३,७३८ अनुपस्थित अथवा आढळून न आलेले मतदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय ७७ अन्य मतदार वगळण्यात आले आहेत.

दरम्यान, जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीवर नागरिकांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन हरकत नोंदविता येणार आहे. ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हरकतींसंदर्भात संबंधितांना नोटिसा देऊन सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व हरकती व दावे तपासून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

याबाबत सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी ही माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button