Uncategorized
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: रांजणगाव ते सोनेसांगवी पठार मार्गावर भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
हा अपघात शनिवारी (२९ ऑगस्ट) रात्री आठच्या सुमारास सोनेसांगवी पठार गावाच्या हद्दीत घडला.दीपक राजेश थोरात (वय २२, रा. टाकळी हाजी, शिंदे वस्ती, ता. शिरूर) हा हिरो स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एमएच १२ यू.वाय ७११२ वरून रांजणगावकडून सोनेसांगवीच्या दिशेने जात होता.
त्यावेळी समोरून आलेल्या एमएच १२ झेडयू ४४१५ क्रमांकाच्या पिकअपने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.


१०५, २८१, १२५(अ)(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार मुंडे (१७९५) असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.