Uncategorizedमहाराष्ट्र

मातोश्री गंगूबाई घावटे यांच्या प्रथम स्मृतिदिनी मंगळवार दिनांक ३० जून रोजी अर्धपुतळ्याचे अनावरण; व ह. भ. प सचिन महाराज पवार यांचे प्रवचन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24},: ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल, जांभळी मळा (शिरूर) येथे मातोश्री स्वर्गीय गंगूबाई प्रभू घावटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मंगळवार, दि. 30 जून रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. यानिमित्त आळंदी येथील प्रसिद्ध ह.भ.प. सचिन महाराज पवार यांचे प्रवचनही आयोजित करण्यात आले आहे.

ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूलच्या जडणघडणीत तसेच संस्थेच्या कार्याला दिशा देण्यात मातोश्री गंगूबाई घावटे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या कार्याचा आणि स्मृतींचा गौरव कायम राहावा, तसेच भावी पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने संस्थेच्या आवारात त्यांच्या अर्धपुतळ्याची उभारणी करण्यात आली असल्याचे प्रा. डॉ. राजेराम घावटे यांनी दिली प्रथम स्मृतिदिनी त्याचे अनावरण होणार आहे.

या कार्यक्रमास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर, आयपीएस अधिकारी प्रशांत सुभे, खासदार निलेश लंके, आमदार माऊली कटके, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, अशोक पवार,प्रदेश जनता दलाचे अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे,भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल बाबुराव पाचर्णे, नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, पंचायत समितीच्या सभापती स्वाती घावटे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button