राष्ट्रीय

शिरूर नगरपरिषदेतील कथित मनमानी कारभारा विरोधात आमरण उपोषण

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर नगरपरिषदेतील कथित भ्रष्टाचार, अनियमितता आणि मनमानी कारभाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाप्रमुख महिबूब सय्यद यांनी सोमवार (दि. १३ जुलै) पासून आमरण उपोषण सुरु केले. 

नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीशेजारी हे आंदोलन सुरू झाले.आंदोलनस्थळी माजी नगराध्यक्ष नसीम खान, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, सामाजिक कार्यकर्ते बापू सानप, बाळासाहेब आवारी,शिरूर प्रवाशी संघटनेचे अनिल बांडे, मनसेचे शहरप्रमुख आदित्य मैड, रवि लेंडे, शिवसेनेचे खुशाल गाडे, आदीनी भेट दिली.

उपोषणकर्ते सय्यद यांनी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामकाजावर गंभीर आरोप केले आहेत. ओला व सुका कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ठेकेदाराला बिले अदा केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच ठेका पद्धतीवरील सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिले जात नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासमोर विविध मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये कचरा खड्ड्यातील प्लास्टिक, पुठ्ठे, रिकाम्या बाटल्या व फाटके कपडे यांची निविदेशिवाय विल्हेवाट लावल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करणे, सफाई कामगारांना श्रमसाफल्य योजनेअंतर्गत तात्काळ घरे उपलब्ध करून देणे, गौण खनिज उत्खनन प्रकरणी दंड वसूल करणे, किमान वेतन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणे तसेच शहरातील धोकादायक विद्युत वाहिन्या हटविणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

या सर्व मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. मात्र, या आरोपांबाबत शिरूर नगरपरिषद प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

खेळाडू व शिक्षिका अनिता भोगावडे यांना डेली न्यूज पोस्ट -२४ चा वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button