Uncategorized
बेकायदा बांधकामे, पूररेषेतील अतिक्रमणे, कान्होबा मंदिर परिसरातील अतिक्रमण तसेच नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या पाइप चोरीच्या घटनांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर शहरातील बेकायदा बांधकामे, पूररेषेतील अतिक्रमणे, कान्होबा मंदिर परिसरातील अतिक्रमण तसेच नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या पाइप चोरीच्या घटनांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
लहुजी शक्ती सेना युवक जिल्हाध्यक्ष विशाल (बंटी) जोगदंड यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील बेकायदा बांधकामांबाबत नगरपरिषदेकडून संबंधित बांधकामधारकांना वारंवार नोटिसा बजावल्या जात असल्याचे सांगितले जाते, त्या नोटिसा पाठविल्या जातात याबाबतची माहिती मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच शहरातील पूररेषेतील अतिक्रमणांवर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, याचा खुलासा करावा आणि कान्होबा मंदिर परिसरातील अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
याशिवाय, शिरूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या पाइप चोरीच्या घटनांमध्ये संबंधित दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणीही लहुजी शक्ती सेनेने केली आहे.
या मागण्यांसंदर्भातील निवेदन नगरपरिषद प्रशासनाकडे सादर करण्यात आले असून त्याच्या प्रती पुणे जिल्हाधिकारी तसेच शिरूर पोलीस ठाणे यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.यावेळी दादाभाऊ लोखंडे यांच्यासह
भाऊसाहेब जाधव विनोद साठे रियाज भाई सय्यद तुषार भाऊ भवाळ मोनिका ताई सुमनताई साळवे जाधव अविनाश साबळे, प्रशांत भाऊ साळवे विश्वास पाटोळे सोनुभाऊ काळोखे ओंकार आढागळे सुमित बागवे सह लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





