Uncategorized

वाढदिवसाचा खर्च टाळून मुलांना गोष्टींची पुस्तके; योगेश जामदार यांचा आदर्श सामाजिक उपक्रम

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}वाढदिवस साजरा करण्यासाठी होणारा अनावश्यक खर्च टाळत मुलांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी आणि मोबाईलच्या आहारी जाण्यापासून त्यांना परावृत्त करण्याच्या उद्देशाने शिरूर तालुका कुंभार समाजाचे अध्यक्ष योगेश सुदामराव जामदार यांच्या वाढदिवसानिमित्त बाल संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांना संस्कारक्षम गोष्टींच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

प्रभाग क्रमांक २ मधील नगरसेविका स्वप्नालीताई जामदार यांच्या मित्र परिवाराच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या बाल संस्कार वर्गात हा उपक्रम पार पडला. देशाचे दानशूर उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या प्रेरणेने तसेच शिरूरच्या नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

योगेश जामदार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबविण्याची परंपरा मित्र परिवाराने कायम ठेवली आहे. याआधी वृक्षारोपण, पेपर वाचनालय सुरू करणे, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच दशक्रिया घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दिशादर्शक फलक उभारणे असे उपक्रम राबविण्यात आले आहेत. यंदा ५ ते २० वर्षे वयोगटातील बाल संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांना गोष्टींची पुस्तके भेट देऊन वाचनाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी बोलताना योगेश जामदार म्हणाले, “मुलांची मोबाईलकडे वाढती ओढ कमी व्हावी, सोशल मीडियापासून दूर राहून वाचनाची सवय लागावी, यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. गोष्टींच्या माध्यमातून मुलांना संस्कार, बोधकथा आणि जीवनमूल्ये सहजपणे समजतील. याचा पालक आणि विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होईल.”

याशिवाय, भविष्यात विद्यार्थी आणि युवकांसाठी वाचनालय, अभ्यासिका तसेच MPSC/UPSC मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

खेळाडू व शिक्षिका अनिता भोगावडे यांना डेली न्यूज पोस्ट -२४ चा वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

कार्यक्रमाचे नियोजन कुंभार आळी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी नगरसेविका स्वप्नालीताई जामदार, संजय कडेकर, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अमित शिर्के, संतोष जामदार, संगीताताई पाटील (जीवन विद्या मिशन), डॉ. वैशालीताई साखरे, मोनालिताई स्वामी, शिरसाठ ताई, विजय शेजवळ, राजकुमार स्वामी, विष्णू जामदार, शंकर जामदार, दीपक शिर्के, शरद जामदार यांच्यासह अनेक पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button