Uncategorized

शिरूरमध्ये इस्कॉनतर्फे भव्य जगन्नाथ रथयात्रा; १६ जुलै रोजी नगरपरिषद मंगल कार्यालयापासून होणार प्रारंभ

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}इस्कॉन शिरूरच्या वतीने गुरुवार, १६ जुलै रोजी शिरूर शहरात प्रथमच भव्य श्री जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या रथयात्रेत भगवान श्रीजगन्नाथ, बलभद्र व सुभद्रा यांच्या रथाचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रथयात्रेचा प्रारंभ दुपारी १ वाजता शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय परिसरातून होणार आहे. त्यापूर्वी दुपारी १ वाजता रथाची आरती व पूजन, तर १.३० वाजता रथयात्रेला प्रारंभ होईल. सायंकाळी कीर्तन-भजन, ७ वाजता ५६ भोग दर्शन आणि ७.३० वाजता महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.

रथयात्रा राम मंदिर (सुभाष चौक), सोनार आळी, कुंभार आळी, मुंबई बाजार, आईड बाजार, कापड बाजार, रामआळी, विद्याधाम कॉर्नर, निर्माण प्लाझा, सेंटर दवाखाना, इंदिरा गांधी पुतळा मार्गे शिरूर नगरपरिषद कार्यालयापर्यंत जाणार आहे.

इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या प्रेरणेने आयोजित या धार्मिक सोहळ्यात हरिनाम संकीर्तन, भक्तिगीते आणि महाप्रसादाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.

या रथयात्रेत सहभागी होऊन भगवान श्रीजगन्नाथांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन इस्कॉन शिरूर, शिरूर शहर व पंचक्रोशीतील भक्तवृंद यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९६२३४४२५१०, ८००७४७२७७७ आणि ९८२२२८१४११ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button