Uncategorizedलेखविशेष

ज्ञान, संस्कार आणि नेतृत्वाचा संगम : शिरूर व गोलेगाव मधील साधना मॉडेल स्कूलची यशोगाथा

“शाळा ही केवळ चार भिंतींची इमारत नसते, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची कार्यशाळा असते.” शाळेचे खरे उद्दिष्ट केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान देणे नसून विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्ये, नैतिकता, विचारशक्ती, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हे आहे.

याच विचारातून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले संजय चंद्रराव शितोळे यांनी शिक्षणाला एक नवी दिशा दिली. सन २००५ पासून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात कार्य सुरू केले. सुरुवातीला त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, विशेषतः स्पर्धा परीक्षा आणि पोलीस व आर्मी भरतीसाठी मार्गदर्शन केले. या प्रवासात त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी शालेय जीवनातच होते. त्यामुळे केवळ स्पर्धा परीक्षांची तयारी पुरेशी नसून बालपणापासूनच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे आवश्यक आहे.

हीच जाणीव मनात ठेवून त्यांनी २०22 मध्ये अवघ्या ६० विद्यार्थ्यांसह साधना मॉडेल स्कूल’ची स्थापना केली. आज ही संस्था समाजात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी ओळख निर्माण करत आहे.

‘साधना मॉडेल स्कूल’ या नावामागेही व्यापक विचार आहे. ‘साधना’ म्हणजे सातत्यपूर्ण प्रयत्न, संस्कार आणि उत्कृष्टतेचा ध्यास. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक आणि भावनिक विकासासाठी आवश्यक असे वातावरण येथे निर्माण करण्यात आले आहे. कला, विज्ञान, मानवविद्या, क्रीडा, संस्कार आणि जीवनकौशल्यांचा समतोल विकास हा या शिक्षणपद्धतीचा गाभा आहे.

आजच्या शिक्षण व्यवस्थेतील मोठी उणीव म्हणजे माहितीचा भरणा होतो; पण विवेक, चिकित्सक दृष्टी (Critical Thinking) आणि निर्णयक्षमता विकसित करण्यावर पुरेसा भर दिला जात नाही. आदर्श शाळेचे ध्येय केवळ परीक्षेत गुण मिळवणारे विद्यार्थी तयार करणे नाही, तर स्वतः विचार करणारे, प्रश्न विचारणारे, समस्यांचे समाधान शोधणारे आणि समाजासाठी जबाबदार नागरिक घडवणे हे आहे.

शालेय जीवन हा मानवी आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. याच काळात विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख निर्माण करावी, आपल्या क्षमता ओळखाव्यात आणि जीवनाचे ध्येय निश्चित करावे. करिअरमध्ये यशस्वी होण्याबरोबरच समाज आणि राष्ट्रासाठी योगदान देणारा नागरिक घडणे हेच शिक्षणाचे अंतिम ध्येय आहे.

आदर्श शाळा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, शिस्त, सामाजिक जाणीव आणि सेवाभाव विकसित करते. पुस्तकातील ज्ञानासोबतच प्रत्यक्ष जीवनातील अनुभव, उपक्रम, संस्कार आणि मूल्यशिक्षण यांनाही तेवढेच महत्त्व दिले जाते.

आधुनिकीकरणाच्या वेगवान युगात विज्ञान आणि तंत्रज्ञान स्वीकारणे आवश्यक असले, तरी भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्यांची नाळ तुटू देता कामा नये. आजची पिढी आधुनिकतेकडे झुकत असताना आपल्या संस्कृतीपासून दूर जात असल्याची खंत व्यक्त केली जाते. त्यामुळे शिक्षणाने आधुनिक ज्ञानासोबत भारतीय संस्कारांची जोड दिली पाहिजे.

खऱ्या अर्थाने आदर्श शाळा तीच, जी विद्यार्थ्यांना केवळ

 नोकरीसाठी सक्षम बनवत नाही, तर चांगला माणूस, संवेदनशील नागरिक आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देणारे व्यक्तिमत्त्व घडवते. कारण शिक्षणाचा अंतिम हेतू पदवी मिळवणे नसून जीवन घडवणे हा आहे.

*सहशालेय उपक्रम आणि सर्वांगीण विकास*

सूक्ष्म निरीक्षण केल्यास आपल्याला आढळते की आधुनिकीकरणामुळे आपली भारतीय संस्कृती व परंपरा लुप्त होत चालली आहे. एक वेळ अशी येऊ शकते की…… पूर्णपणे नष्ट होऊ शकते, कारण *शिक्षणाचे पश्चातीकरण*

म्हणूनच *साधना मॉडेल स्कूल* भारतीय संस्कृती चे जतन करण्यासाठी सकाळच्या प्रार्थना सभेत मंत्रोच्चार, श्लोक पठण, इ. तसेच सामान्य ज्ञान, यांसारख्या उपक्रमाचा कटाक्षाने समावेश करते.

मुलांच्या नेतृत्व गुणाचा विकास करण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जातात.

     याशिवाय क्रीडास्पर्धा, वार्षिक स्नेहसंमेलन, आनंददायी शनिवार, धार्मिक सण उत्सव, इ. अनेक उपक्रमांचे आयोजन करते.

      या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे अगदी अल्पावधीतच *साधना मॉडेल स्कूल* पालकांच्या पसंतीस खरी उतरली आहे.पालकांचा वाढता कल पाहू शाळेच्या दोन शाखा सुरू झाल्या आहेत.*पहिली शाखा साधना इंटरनॅशनल स्कूल,स्टेट बँक कॉलनी, शिरूर व दुसरी शाखा साधना मॉडेल स्कूल, गोलेगाव, शिरूर* 

येथे यशस्वी रित्या सुरू आहेत.

*Tradition of Excellence*

हे ब्रीद असणाऱ्या *साधना मॉडेल स्कूल* च्या यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button