Uncategorized

मोबाईलचा विश्वासाने दिलेला ताबा घेत खात्यातून ३ लाख ४४ हजारांची रक्कम लंपास

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}: मोबाईल विश्वासाने ताब्यात दिल्यानंतर त्याचा गैरवापर करून यूपीआय आणि फोन-पेच्या माध्यमातून विविध खात्यांतून तब्बल ३ लाख २९ हजार ५९६ रुपये परस्पर काढून घेतल्याची घटना रांजणगाव गणपती परिसरात घडली. मोबाईलसह एकूण ३ लाख ४४ हजार ५९६ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रवीना व्यंकटी चित्ते (वय २५) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुणाल बळवंजकर, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, मूळ रा. सातारा याच्याविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जून २०२६ ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत फिर्यादीने आपला ओपो ए१६ मोबाईल आरोपीकडे विश्वासाने दिला होता. मात्र आरोपीने मोबाईल परत न करता त्यातील यूपीआय/फोन-पेचा वापर करून महाराष्ट्र बँक तसेच फिनो बँकेतील खात्यांमधून वेळोवेळी एकूण ३ लाख २९ हजार ५९६ रुपये काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

मोबाईलची किंमत १५ हजार रुपये असून, मोबाईल व खात्यातून काढलेली रक्कम मिळून ३ लाख ४४ हजार ५९६ रुपयांचा अपहार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार पवार (ब.नं. ३४३२) तपास करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस हवालदार कोळेकर (ब.नं. २१६२) यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button