शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम _)-24}श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचा आगमन व दर्शन सोहळा गुरुवार (दि. २७ ऑगस्ट) रोजी नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आला आहे. विठ्ठलनगर येथील स्वामी छाया येथे दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत हा सोहळा होणार आहे.
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांनी २३ वर्षे वापरलेल्या चर्म पादुकांचे दर्शन या सोहळ्यात भक्तांना घेता येणार आहे. परमपूज्य गुरुवर्य वेदमूर्ती नितीन प्रभाकर पुजारी यांच्या हस्ते पादुका पूजन करण्यात येणार आहे.
या धार्मिक सोहळ्याचे निमंत्रक विठ्ठल रामचंद्र खोडदे व सौ. कल्पना विठ्ठल खोडदे आहेत. स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पादुकांचे दर्शन तसेच प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : विठ्ठलनगर, स्वामी छाया, रामकमल कन्स्ट्रक्शन
वेळ : दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत
दिनांक : गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६
“या रे या, स्वामी दारी… पादुका दर्शन घेऊ सारे!” या भक्तिमय आवाहनाने परिसरात या सोहळ्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.