शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}येथील जुन्या पिढीतील सोन्या चांदीचे व्यापारी व प्रगतशील शेतकरी दिलीपभाई कांतीलाल शहा (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने शिरूरच्या व्यापारी व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
दिलीपभाई शहा यांचा शिरूर परिसरातील धार्मिक व सामाजिक कार्यात सातत्याने सहभाग असायचा. व्यापारी क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यातून स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. शेती क्षेत्रातही ते प्रगतशील शेतकरी म्हणून परिचित होते.
ते ज्येष्ठ व्यापारी सुभाष शहा यांचे बंधू व व्यावसायिक जेसल शहा यांचे वडील होत. तसेच आनंद नागरी पतसंस्थेचे संचालक देवल शहा, व्यावसायिक अमित शहा, भूषण शहा व धीरज शहा यांचे ते काका होत. दिव्य व श्रेय शहा यांचे ते आजोबा होत.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल व्यापारी, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.