Uncategorized

एसटी बस चालक व वाहकाला मारहाण करून वाहका कडील रोकड लुटणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी केली अटक

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: एसटी बस चालक व वाहकाला मारहाण करून वाहका कडील रोकड लुटणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आली असून, गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार पोलिसांनी जप्त केली आहे.
दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री शिरूर जवळील न्हावरा फाटा जवळ पुणे-अहिल्यानगर मार्गावर एसटी बस क्रमांक एमएच १४ एनपी ०८३८ जात असताना क्रमांक नसलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारमधून आलेल्या चार जणांनी बस अडवून चालकाला व वाहकाला शिवीगाळ व मारहाण केली. आरोपींनी वाहकाकडील ८ हजार ९६० रुपये जबरदस्तीने काढून घेतले, तसेच बसच्या समोरील काच फोडून नुकसान केले. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तपासाची सूत्रे हाती घेत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व डी.बी. पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. पथकाने शिरूर, अहिल्यानगर, आळंदी, भोसरी व निगडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
या तपासातून
अजयकुमार शिनू चव्हाण, रा. राष्ट्रप्रेम नगर, ओमसाई बिल्डिंग, रूम नं. २१,हवेली मूळ रा. चमनाळा, ता. शाहापूर, जि. यादगीर, कर्नाटक.
पवन मधुकर घोलप, रा. इंदिरानगर, बाबन महाराज मठ, आळंदी, ता. खेड, जि. पुणे. मूळ रा. बोरगाव, ता. गेवराई, जि. बीड.
आकाश सोमनाथ काळे, रा. इंदिरानगर, बाबन महाराज मठ, आळंदी, ता. खेड, जि. पुणे. मूळ रा. बोरगाव, ता. गेवराई, जि. बीड.
सचिन अशोक घोलप, रा. ममता चौक, दिघी, ता. हवेली, जि. पुणे. मूळ रा. बोरगाव, ता. गेवराई, जि. बीड.
यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत अटक केली.
गुन्ह्यात वापरण्यात आलेली एमएच १४ एमडब्ल्यू ५२३४ क्रमांकाची स्कॉर्पिओ कार पोलिसांनी जप्त केली आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, राहुल वाघमोडे, आबादास थोरवे , निखिल राऊत, सचिन भोई, अजय पाटील आणि दादाराव नागरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button