Uncategorized
भक्तीमय वातावरणात शिरूरकरांचा बाप्पाला निरोप १० तासांहून अधिक काळ चाललेली विसर्जन मिरवणूक शांततेत; आकर्षक रथ, देखावे आणि ढोल-ताशांनी रंगली मिरवणूक
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}सुखकर्ता असणा-या आणि आनंद मांगल्य यांचे प्रतिक असणा-या श्रीगणेशाला शिरूरकरांनी अत्यंत भक्तीमय वातावरणात निरोप दिला.

शिरूरची मुख्य मिरवणुक दुपारी दोनला सुरु होऊन रात्री साडेबारा एकच्या सुमारास संपली. तब्बल १० तासाहून अधिक काळ चाललेली मिरवणुक शांततेत पार पडली.

मागील बारा दिवसापासून गणेशोत्सवाचा हा आनंदमय सोहळा सुरू होता. शहरातील गणेश विसर्जन घाट लाटे आळी या परिसरात आहे. येथील घोडनदीवरील विसर्जन घाटावर सकाळ पासून भाविकांनी विसर्जनासाठी गर्दी केली होती. अनेकांनी घरगुती गणेशाचे दुपार पर्यत विसर्जन करून घेतले आणि त्यानंतर सार्वजनिक गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी बाहेर पडले.

शिरूर शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुक दुपारी सुरु झाली. मानाचा पहिला गणपती असणारा समस्त नामदेव समाज श्रीराम मंदिर राम आळी तील श्रीगणेशाचे पूजन व आरती माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, विश्व स्त विवेक बगाडे, महेश बोत्रे, मंगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झाल्यावर विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली.

मानाच्या शिवसेवा मंदिर येथील श्रीगणेशाची आरती विश्वस्त व शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष. अडव्होकेट सुभाष पवार, विश्वस्त बाळासाहेब परदेशी, नाना खांडरे व मनसूख गुगळे यांच्या हस्ते झाल्यावर शिवसेवा मंडळ ट्रस्टची गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाली

.या मानाच्या गणेश मंडळाच्या श्रीगणेशाचे लाटेआळीतील शनि मंदिर जवळील गणेश. विसर्जन घाट येथे सायंकाळी चार पूर्वी विसर्जन झाले.
हनुमान मंदिर गणेश मित्र मंडळ व महाराणा प्रताप गणेश मित्र मंडळ यांच्या श्री.गणेशाची मूर्ती पालखी मध्ये विराजमान होती.

. या सर्व गणेश मंडळाच्या गणेशाचे सायंकाळी विसर्जन झाले होते. त्रिमूर्ती गणेश मित्र मंडळ रेव्हन्यू कॉलनी यांच्या श्री गणेशाची मिरवणूक पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात निघाली होती.

सिंहगर्जना मित्रमंडळ ढोर आळी यांनी आकर्षक देखावा विसर्जन मिरवणूक करिता सादर केला होता. श्रीमंत अष्टविनायक राजा गणेश मित्र मंडळ गोपाळवस्ती याचा गणेश तुळजाभवानी रथात विराजमान होता. सिद्धार्थ मित्र मंडळ यांचा आकर्षक सजावट रथ विसर्जन मिरवणुकीत होता , आखिल गुजर कॉलनी मित्र मंडळ यांनी आकर्षक शिवमंदिर साकारून त्यात श्रीगणेशाला विराजमान केले होते.
सजावट केली होती. नवसाला पावणारा अशी ख्याती असणारा हलवाई चौक गणेश मित्र मंडळच्या हलवाई गणेश विघ्नहर्त्या गणेश मंदिरात विराजमान झाला होता. हनुमान गणेश मित्र मंडळ मारुती आळी यांनी सोशल मीडियाचे परिणाम हा सामाजिक देखावा सादर केला होता. आखिल रामआळी गणेश मित्र मंडळ यांनी श्रीकृष्ण रथ साकारला होता. कुंभार आळी गणेश मित्र मंडळ, मुंजोबा मंदिर गणेश मित्र मंडळ, छत्रपती संभाजी गणेश मित्र मंडळ हुडको कॉलनी यांनी ही आकर्षक अशी सजावट विसर्जन मिरवणूक साठी केली होती.




