राष्ट्रीय
भक्तीमय वातावरणात शिरूरकरांचा बाप्पाला निरोप ढोल-ताशांचा गजर, आकर्षक रथ-पालख्या आणि पर्यावरण जनजागृतीने विसर्जन मिरवणुकीला रंगत

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24): सुखकर्ता आणि आनंद-मांगल्याचे प्रतीक असलेल्या श्री गणरायाला शिरूरकरांनी भक्तीमय वातावरणात भावपूर्ण निरोप दिला. शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका दुपारपासून सुरू झाल्या.



ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद, भजन, आकर्षक रथ-पालख्या आणि विविध देखाव्यांमुळे शहरातील वातावरण गणेशमय झाले होते.


या गणरायाचे लाटे आळीतील शनि मंदिराजवळील गणेश विसर्जन घाटावर सायंकाळी चारपूर्वी विसर्जन करण्यात आले.
टाळ-मृदंग आणि भजनाच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकांमध्ये पर्यावरण संवर्धन व जनजागृतीचे संदेश देणारे फलकही कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते.
या मंडळांच्या गणरायांचे सायंकाळी विसर्जन करण्यात आले. त्रिमूर्ती गणेश मित्र मंडळ, रेव्हन्यू कॉलनीची मिरवणूक पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात निघाली.
सिद्धार्थनगर, एकलव्य गणेश मित्र मंडळ पाण्याची टाकी-भिल्लवस्ती, वक्रतुंड गणेश मित्र मंडळ आदिनाथनगर, श्री साई गणेश मित्र मंडळ हुडको कॉलनी, नवयुग गणेश मित्र मंडळ पाण्याच्या टाकीजवळ, सुंदर सृष्टी गणेश मित्र मंडळ आणि मौर्य पुरम गणेश मित्र मंडळ यांचा समावेश होता.
आणि जल्लोष पाहायला मिळाला. विविध मंडळांनी सादर केलेले आकर्षक देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. नाशिक, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यांतून आलेल्या वाद्यवृंदांनी मिरवणुकीत रंगत वाढवली. यंदा विसर्जन मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला.
