Uncategorized

‘झिंजाय ‘ नंतर अर्कचा नवा ख्याब : २ ऑक्टोबरला गाणे प्रदर्शित

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरविलेल्या ‘झिंजाय’ या फीचर फिल्मनंतर चित्रपट निर्माते अर्क यज्ञ आता ‘ख्वाब’ हे नवे ओरिजिनल गाणे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अहिल्यानगरच्या पत्रकार चौकातील ‘दीप सिम्फोनीज’च्या माध्यमातून निर्मित या गाण्याची संगीत निर्मिती ‘कबीर सिंग’ चित्रपटातील ‘कैसे हुआ’चे म्युझिक प्रोड्युसर गौरव वासवानी यांनी केली आहे.

‘ख्वाब’च्या म्युझिक व्हिडिओचे चित्रीकरण अहिल्यानगरातील विविध ठिकाणी करण्यात आले असून, शहरातील लोकेशन्सना सिनेमॅटिक स्वरूपात सादर करण्यात आले आहे. प्रेम, स्वप्न आणि वास्तव यांची सांगड घालणारे हे गाणे अर्कच्या ‘एहमियत’ या संगीतप्रकल्पातील पहिले चॅप्टर आहे.

अर्क यज्ञ यांच्या ‘झिंजाय’ या चित्रपटाने विविध चित्रपट महोत्सवांमध्ये ‘Best Film’सह अनेक पुरस्कार मिळविले आहेत. दिग्दर्शक दीपक घारू यांनाही ‘Best Director’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नवी दिल्लीतील १५व्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्येही ‘झिंजाय’ला विशेष गौरव मिळाला आहे.

‘ख्वाब’ची गीत व संगीत रचना अर्क यज्ञ यांची असून, गौरव वासवानी यांनी संगीत निर्मिती केली आहे. कार्यकारी निर्माते आदर्श गोसावी व कुणाल घाडगे, क्रिएटिव्ह कन्सल्टंट दीपक घारू, प्रॉडक्शन मॅनेजर ऋषिकेश बजाज, छायांकन आर्यन भट यांचे योगदान आहे. ‘मनस्वी’च्या भूमिकेत वैष्णवी घोडके दिसणार आहे.

‘ख्वाब’ २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून Spotify, YouTube Music, Amazon Music, Apple Musicसह प्रमुख डिजिटल म्युझिक प्लॅटफॉर्मवर ते उपलब्ध होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button