विशेष

नाना, तुम्ही गेलात, आमचा आधार गेला!’ शिरूरमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना सामूहिक श्रद्धांजली

शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}आपल्या अभिनयाने रुपेरी पडद्यावर वास्तवाचे दर्शन घडविणारे आणि सामाजिक बांधिलकीतून सामान्य माणसाच्या दुःखाला हात घालणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वासह सामाजिक क्षेत्राचीही मोठी हानी झाली आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत शिरूरकर नागरिकांच्या वतीने आयोजित सामूहिक श्रद्धांजली सभेत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

शिरूर बसस्थानकाजवळील शिवसेना मंदिर सभागृहात ही सभा झाली. नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे आणि ज्येष्ठ रंगकर्मी विलासराव गोसावी यांच्या हस्ते नाना पाटेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

मनःशांती छात्रालयाचे विनायक सपकाळ यांनी नाना पाटेकर यांच्याशी संबंधित आठवणी सांगताना भावनांना वाट मोकळी करून दिली. छात्रालयातील मुलांना भेटण्यासाठी येण्याचे आश्वासन नानांनी दिले होते; मात्र त्यांच्या निधनामुळे ही भेट आता होणार नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘नाना, तुम्ही गेलात, आमचा आधार गेला,’ या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नानांच्या निधनाने सामाजिक संस्थांचा आधार हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

डॉ. दीपक गायकवाड यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नाना पाटेकर यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. धोरणात्मक बदलांच्या दृष्टीनेही त्यांच्या कामाचे महत्त्व अधोरेखित करत, तळागाळातील माणसाशी असलेली त्यांची बांधिलकी हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ रंगकर्मी विलास गोसावी यांनी नानांचे अभिनयातील योगदान आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य यांचा गौरव केला. नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी सांगितले की माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व अभिनेता नाना पाटेकर या दोघांनी सामान्य माणसासाठी मोठे काम केले व सन २०२६ मध्ये ही दोन्ही व्यक्तिमत्वे काळाच्या पडदाआड गेली.
ज्येष्ठ पत्रकार नितीन बारवकर यांनी नाना पाटेकर यांच्याशी झालेल्या व्यक्तिगत भेटीचा अनुभव व्यक्त केला. यावेळी योगेश जामदार, आबिद शेख, संजय बारवकर, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, डॉ. वैशाली साखरे प्रितेश फुलडाळे,आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.

भूमीपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे, नगरसेवक सागर नरवडे, माजी नगरपरिषद शिक्षण मंडळ सभापती प्रशांत शिंदे, तुकाराम खोले, संतोष शितोळे, माजी नगरसेवक आबिद शेख, बिजवंत शिंदे, माजी सरपंच प्रकाश थोरात, प्रितेश फुलडाळे, विजय शेजवळ, शशिकला काळे, सीमा सपकाळ, एकनाथ गायकवाड,विशाल जोगदंड,डॉ. अतुलकुमार बेंद्रे, रमेश दसगुडे, सुदर्शन दरेकर, संतोष शिंदे, अर्जुन बढे, बंटी जोगदंड, सुभाष चोरडिया,आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. सूत्रसंचालन योगेश जामदार यांनी केले, तर सुशांत कुटे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button