शैक्षणिक

आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धेत डेक्क्न स्कूल शिरुर प्रथम

द्वितीय क्रमांक -पोद्दार स्कूल शिरुर , तृतीय क्रमांक विजयमाला स्कूल तर उत्तेजनार्थ बालाजी सेमी इंग्लिश मिडियम स्कुल

आंतर शालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धेत डेक्कन स्कूल शिरुरला प्रथम क्रमांक
शिरुर दिनांक ( वार्ताहर )
डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश आणि सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रकल्प स्पर्धेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रकल्प स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रकल्प साजरे केले. यामध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. विज्ञान दिनानिमित्त दिनांक एक मार्च 2025 रोजी आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शिरूर व परिसरातील दहा शाळांच्या संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घघाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले . कुटे यांच्या हस्ते सर सी. व्ही .रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. . यावेळी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य नीरज राय, विद्याधाम प्रशालेचे माजी मुख्याध्यापक व्हि.डि.कुलकर्णी, ज्ञानगंगा शाळेचे डॉ. नितीन घावटे , डेक्कन स्कूल चे प्राचार्य डॉ. समीर ओंकार, सुधाकर पोटे, गणेश मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. चंद्रकांत धापटे व व प्रा. अलका बेलोटे यांनी काम पाहिले. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटी, बायो फ्युएल , स्मार्ट सिक्युरिटी सिस्टीम , स्वच्छ भारत आधी विषयांवर प्रकल्प सादर केले. स्पर्धेतील विजेत्या संघांना डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याचवेळी डेक्कन स्कूलच्या वेबसाईटचे देखील उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेच्या सर्वसाधारण विजेतेपदाचा मान डेक्कन स्कूल ला मिळाला . डेक्कन स्कूल मधील शिक्षक लहू धारजे व सोनाली लोखंडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
प्रथम क्रमांक: डेक्कन स्कूल शिरूर
द्वितीय क्रमांक: पोद्दार स्कूल शिरूर
तृतीय क्रमांक : विजय माला विद्यामंदिर
उत्तेजनार्थ: बालाजी सेमी इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button