विशेष

शिरुर परिसरात पाउसाची हजेरी

शिरुर ( टीम डेली न्यूज पोस्ट -24 )
शिरुर शहर आणि परिसरात आज अवकाळी पाउसाने हजेरी लावली अचानक आलेल्या पाउसाने नागरिकांची त्रेधात्रिपिट उडाली .
पाउसामुळे परिसरातील कांदाचे व कैरीचे नूकसान झाले .
आज सकाळ पासून शहरातील उकाड्याचे प्रमाण वाढले होते . सायंकाळी हवामान ढगाळ झाले आणि आभाळ भरुन आले व पाउसाची संततधार सुरु झाली . वातावरणातील गरमीचा पार्श्वभूमीवर अचानक आलेल्या पाउसाने वातावरणात आल्हादायकपणा आल्याने नागरिक सुखावले गेले . परंतु परिसरातील कांदा पीक व कैरी याचे मात्र नूकसान झाले पाउसामुळे शहरातील विद्युत पुरवठा ही खंडित झाला होता .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button