राष्ट्रीय

दंगा काबूची पोलीसांचा वतीने शिरुर येथे रंगीत तालीम

 

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम 24)
आज सकाळी अकराच्या सुमारास लाटेआळी येथील शनि मंदिर परिसरात पोलीसांची व्हॅन व गाड्या दाखल होतात . हातात काठ्या आणि जाळ्या घेवून पोझिशन घेत पोलीस जवान रस्त्यावर येतात , धुराचे लोट  नेमके काय झाल आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागते अन थोड्याच वेळ्यात कळते की शिरुर पोलीसांचा वतीने आगामी काळातील विविध धर्मियांच्या सणांच्या पार्शवभूमीवर दंगा काबूची रंगीत तालीम सुरु आहे .
शिरूर पोलीस स्टेशनचा वतीने रनजान ईद व गुढीपाडवा , रमजान महिना, श्रीराम नवमी, हनुमान जयंती व छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास या आगामी सणाचे अनुषंगाने शनी मंदिर परिसर येथे दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आलीदंगा काबू योजना सरावा दरम्यान 3 हॅन्ड ग्रॅनाईट खर्ची करण्यात आले.
दंगा काबु योजना सरावात 1 पोलीस निरीक्षक 2 पोलीस उपनिरीक्षक ,40 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतल्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button