महाराष्ट्रराष्ट्रीय

रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी रोकण्यासाठी ठोस उपाययोजना करा

जनता दल धर्मनिरपेक्षचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाउ शेवाळे

 

शिरुर( डेली न्यूज पोस्ट २४ टीम )
रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी संदर्भात चिंता व्यक्त करुन ही गुन्हेगारी रोकण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी जनता दल धर्मनिरपेक्षचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाउ शेवाळे यांनी केली आहे .
शेवाळे या संदर्भात म्हणाले  की रांजणगाव पंचतारांकित  औद्योगिक वसाहत ही देशातील एक महत्वाची औद्योगिक वसाहत आहे .  या वसाहतीत अनेक आंतरराष्ट्रीय , राष्ट्रीय व स्थानिक कंपन्या कार्यरत असून मोठ्या संख्येने कामगार  आहेत. पुणे शहरा लगत असणारी ही वसाहत मोठ्या प्रमाणावर विकसित व विस्तारत आहे .
परंतु मागील काही दिवसापासून
रांजणगाव औद्योगिक क्षेत्रामध्ये व परिसरामध्ये खून, बलात्कार, खंडणी, व हाणामारी , अवैध शस्त्र बाळगणे, अंमली पदार्थची बेकादेशीर विक्री हे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे .
अवैध शस्त्राचे वाढते प्रमाण व नशेचे वाढते प्रमाण चिंता वाढविणारे आहे . वरील परिस्थीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही दिवसापूर्वी १७ वर्षाच्या मुलावरही  जीवघेण्या हल्ला झाला आहे . हे सर्व प्रकार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात अशी मागणी शिरुरचे पोलीस उपविभागीय आधिकारी प्रशांत ढोले यांच्या कडे निवेदनाद्ववारे केली असल्याचे त्यांनी सांगितले .
ढोले यांना निवेदन देताना शेवाळे यांच्या समवेत ,  भाजपा कामगार आघाडीचे तुलसिदास दुंडे ,कारेश्वर इंग्लिश मिडियम स्कूलचा मुख्याध्यापिका स्नेहलत्ता  यादव ,तुलसिदास दुंडे , यांच्यासह स्कूलचा महिला  शिक्षिका उपस्थित होत्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button