अपघात

मोटार सायकल व अज्ञात वाहनाच्या अपघातात मोटारसायकलस्वार ठार

शिरुर ( डेली पोस्ट न्यूज २४ टीम )
पुणे अहिल्यानगर महामार्गावर शिरुर जवळ मोटार सायकल व अज्ञात वाहनाच्या अपघातात मोटारसायकलस्वार ठार झाला .सोमेश्वर बबन पाचर्णे (वय ३२ वर्षे, पाचर्णेमळा तर्डोबाचीवाडी ता शिरुर जि .पुणे) असे मरण पावलेल्याचे नाव आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळु शंकर पाचर्णे (पाचर्णेमळा तर्डोबाचीवाडी ता. शिरुर जि .पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
दिनांक २६ मार्च २०२५ रोजी रात्री अकरा वाजता सोमेश्वर पाचर्णे हे त्याची बुलेट मोटारसायकल एम. एच १२ एस. आर. ६९१३ वरून पुणे अहिल्यानगर महामार्गावरुन सतरा कमानी पुला जवळून जात असताना भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली . धडकेत सोमेश्वर याच्या डोक्याला हातपाय गंभीर मार लागल्याने त्याच्या मृत्यू झाला आहे. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक कुठली खबर न देता पळून गेला. या संदर्भात पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक राऊत तपास करत आहे .
दरम्यान सोमेश्वर पाचर्णे यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगी असा परिवार आहे. तर्डोबाची वाडी येथे शोकाकुल वातावरणात पाचर्णे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button