क्राईम

पोलीसांची अवैध धंद्यांवर  कारवाई 12 किलो गांजा आणि ३ लाख ५६ हजार ७८१ रुपयांचा गुटखा जप्त चार आरोपी ताब्यात

शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
शिरुर शहर व आमदाबाद येथे तीन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यांवर कारवाई करत तब्बल 12 किलो गांजा आणि ३ लाख ५६ हजार ७८१ रुपयांचा गुटखा जप्त करत  चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.


शुभम शंकर मोहीते (वय 29) व विजय केमराज काळे (वय 29, दोघे रा. टाकळीहाजी ,ता शिरुर , जि पुणे ) रफिक चांद शेख (वय 36, रा. बुरूड आळी, शिरूर) रमेश उर्फ रमन रामभाऊ खराडे (वय 33, रा. मंगलमुर्ती नगर, शिरूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आमदाबाद फाटा , ता शिरुर येथे दोन युवकांकडून 4 किलो 185 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला .25 जुलै रोजी स.पो.नि. कुलदीप संकपाळ यांच्या पथकाने पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे

गुरुवर्य विद्याधाम प्रशालेचे माजी मुख्याध्यापक तु. म.परदेशी सर यांना डेली न्यूज पोस्ट टीम -२४ चा वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

मळगंगा लॉन्सजवळ सापळा लावून दोन संशयितांना ताब्यात घेतले. शुभम शंकर मोहीते (वय 29) व विजय केमराज काळे (वय 29, दोघे रा. टाकळीहाजी) यांच्या ताब्यातून 4 किलो 185 ग्रॅम गांजा (किंमत 80 हजार रुपये) आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली. या प्रकरणी एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा (गु.र.नं. 542/2025) दाखल करण्यात आला आहे.
दुसरा घटनेत २५ जुलै रोजी गुलमोहर अपार्टमेंटमध्ये 3.56 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला . रफिक चांद शेख (वय 36, रा. बुरूड आळी, शिरूर) यांच्या गुलमोहर अपार्टमेंटमधील घरावर छापा टाकून वेगवेगळ्या कंपन्यांचा ३ लाख ५६ हजार ७८१ रुपयांचा गुटखा, तंबाखू आणि पानमसाला जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा (गु.र.नं. 543/2025) दाखल करण्यात आला आहे.
26 जुलै रोजी रमेश उर्फ रमन रामभाऊ खराडे (वय 33, रा. मंगलमुर्ती नगर, शिरूर) यांच्या घरावर छापा टाकून 8 किलो गांजा (किंमत 1.20 लाख रुपये) जप्त करण्यात आला. या प्रकरणीही एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली .
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, स.पो.नि. कुलदीप संकपाळ, स.पो.नि. दीपक कारंडे यांच्यासह पो.स.ई. दिलीप पवार, सागर शेळके, पो. हवा तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, नाथसाहेब जगताप, नितीन सुदीक, भाग्यश्री जाधव, सचिन भोई, अंमलदार सागर धुमाळ यांनी घेतली.
पोलीसांनी अवैध धंद्यांवर केलेल्या या कारवायांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button