राष्ट्रीय

क्रांतिवीर हुतात्मा विष्णू पिंगळे जयंतीनिमित्त शाळांना प्रतिमा व माहितीपुस्तकांचे वाटप

oplus_131074
oplus_131074
oplus_131090
oplus_131074
oplus_131074
oplus_131074
oplus_133120
oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24} शिरूर तालुक्याचे सुपुत्र आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान देणारे क्रांतिवीर हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांची जयंती २ जानेवारी रोजी साजरी होणार आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर यांच्या वतीने शिरूर शहरातील विविध शाळांना हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या प्रतिमेचे व माहितीपुस्तकाचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमावेळी डेक्कन इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक डॉ. समीर ओंकार, शिरूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रवीण मुथा, प्रा. सतीश धुमाळ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. समीर ओंकार यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. शिरूर तालुक्यातील तळेगाव येथील हे सुपुत्र असून, त्यांच्या जीवनकार्याची व देशासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. यासाठी विविध शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. जयंतीच्या औचित्याने शिरूर शहरातील सर्व शाळांना पिंगळे यांचे छायाचित्र भेट देण्यात येत आहे.

या अंतर्गत जीवन विकास मंदिर, ज्ञानगंगा विश्व विद्यालय, सीताबाई थिटे औषधनिर्माण महाविद्यालय, चांदमल ताराचंद बोरा कॉलेज, विद्याधाम प्रशाला, रसिकलाल माणिकचंद धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल, बी.के.सी. स्कूल यांना प्रतिमा भेट देण्यात आल्या आहेत. तसेच शिरूर नगरपरिषदेच्या सर्व मराठी शाळा, व्हिजन इंटरनॅशनल स्कूल, बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल, सेंट जोसेफ स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, सूर्यकांत पलांडे ज्युनिअर कॉलेज, साधना इंटरनॅशनल स्कूल, रयत शाळा व अन्य शाळा यांच्यासह शिरूर नगरपरिषद कार्यालय, तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथेही पिंगळे यांची प्रतिमा देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. ओंकार यांनी दिली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ होऊन क्रांतिकारकांच्या बलिदानाची जाणीव निर्माण होईल, असा विश्वास डॉ. ओंकार यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button