राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सयुंक्त जयंती उत्सव समितीचा वतीने दिनांक ११ एप्रिल ते १३एप्रिल पर्यत व्याख्यानमाला
प्रसिध्द शिव व्याख्याते नितीन बानगुडे ,वसंत हंकारे ,डॉ . विनोद बाबर यांची व्याख्याने
शिरुर( डेली न्यूज पोस्ट टीम-24)राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सयुंक्त जयंती उत्सव समितीचा वतीने दिनांक ११ एप्रिल ते १३ एप्रिल पर्यत विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर उद्यान , एस . टी . स्टॅड समोर दररोज सायंकाळी ७ वाजता व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे .
११ एप्रिलला डॉ . विनोद बाबर यांचे १२ एप्रिलला शिव व्याख्याते नितीन बानगुडे यांचे तर १३ एप्रिलला वसंत हंकारे यांचे व्याख्यान होणार आहे .
१४ एप्रिलला सकाळी ११ वाजता अभिवादन सभा , दु .१२ वाजता स्नेहभोजन सांस्कृतिक कार्यक्रम व सायंकाळी ५ वाजता बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे .सयुंक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भालेराव असून उपाध्यक्ष नीलेश जाधव ॲड . मायाताई गायकवाड , ॲड . कुणाल गायकवाड आहेत तर समिती सचिव प्रमोद गायकवाड आहेत .व्याख्यान मालेस अभिवादन सभा व मिरवणूकीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उत्सव समितीचा वतीने करण्यात आले आहे .