राष्ट्रीय

राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले व विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सयुंक्त जयंती उत्सव समिती शिरुर व शिरुर नगरपरिषद यांच्या वतीने राज्यस्तरीय क्क्तृत्व स्पर्धा

१२ एप्रिल पर्यत स्पर्धकांनी नाव नोंदणी करावी

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट 24 )
शिरुर नगरपरिषद घोडनदी व राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले व विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सयुंक्त जयंती उत्सव समिती शिरुर यांच्या वतीने रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान शिरूर येथे राज्यस्तरीय वक्क्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .
या स्पर्धेसाठी विषय आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचे साहित्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार व आजची आधुनिक विचारसरणी, महात्मा फुलेंचे शैक्षणिक विचार व आजची शैक्षणिक धोरणे
बक्षीस विजेत्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र रोख रक्कम देण्यात येणार आहे.
स्पर्धकांनी वरील विषयांवर वक्तृत्व सादर करायचे आहे .वक्तृत्व सादर करण्यासाठी ७ मिनीट वेळ राहील. स्पर्धकाने शाळेचे किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
स्पर्धा दोन गटांत होईल.
गट १ – शालेय गट इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी गट २ महाविद्यालीन गट इयत्ता ११ वी व १२ वी व
सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी ,प्रत्येक गटातून ३ नंबर काढण्यात येतील.
प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येईल. नाव नोंदणी दि.१२/०४/२०२५ पूर्वी करावी नाव नोंदणी साठी संपर्क प्रा . सुदाम वीर -९८५०५४ ५१७१
प्रा . रतनकुमार ससाणे -९९७०७४७३०९
प्रा विनोद शिंदे -९७६६०७३५९९
ॲड . मायाताई गायकवाड- ९२२६९ ६१३१५ यांच्या कडे करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button