शैक्षणिक

मुख्याध्यापिका शारदा मिसाळ सेवानिवृत्त


शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट 24 टीम )पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री गुरुदेव दत्त माध्यमिक विद्यालय सविंदणे ता. शिरूर येथील मुख्याध्यापिका शारदा मिसाळ यांच्या सेवापुर्ती कार्यक्रमानिमित्त नागरी सत्कार करण्यात आला.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री. गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणेच्या मुख्याध्यापिका शारदा मिसाळ यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त ग्रामस्थ व विद्यालयाने नागरी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनीषा नरवडे होत्या .माजी प्राचार्य  नानासाहेब निंबाळकर, उद्योजक कैलास पडवळ विठ्ठल मिंडे, माजी सरपंच देवरामदादा मिंडे भाऊसाहेब लंघे, शुभांगी पडवळ,ॲड. भोलेनाथ पडवळ, ग्रामपंचायत सदस्य मालुताई मिंडे नंदाताई मिंडे ,सचिव बाळासाहेब पडवळ, अर्जुन लंघे, बाळासाहेब भोर, पत्रकार अरुण मोटे, पत्रकार सुदर्शन दरेकर, सुनील शिंदे, दत्तात्रय घाडगे, मेजर नाथू पारधी, शेलगाव चे माजी मुख्याध्यापक भारत कांबळे, दिलीप गिरंजे , माधव शितोळे, डॉ. दत्तात्रय बोबडे प्रा. रतन ससाने ,प्रा. बाळासाहेब नान्नोर जालिंदर घाडगे, भरत पडवळ परशुराम नरवडे, पोपट पडवळ ,इंद्रभान कळमकर, आर .के .ठाकूर , डॉ. सायली मिसाळ -जगताप ,मंदार जगताप ,गिरीजा गायकवाड,मंगल वाघमारे, विजया मिसाळ, रमेश मिसाळ, शुभांगी मिसाळ, अजिनाथ जाधव, दिलीप मिसाळ, रवींद्र मिसाळ, दयानंद वाघमारे, गौरव मिसाळ आदी उपस्थित होते.
यावेळी गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना 500 वह्या मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या,
शारदा मिसाळ यांनी शिक्षीका म्हणून सविंदणे या गावात सर्वात जास्त काळ सेवा केली . श्री. गुरुदेव दत्त विद्यालयात 14 वर्ष सेवा केल्यानंतर इनामगांव आणि करडे याठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम केले. सेवानिवृत्तीला एक वर्ष शिल्लक असताना पुन्हा सविंदणे या गावात मुख्याध्यापिका म्हणून त्यांना संधी मिळाली . विद्यालयाला पायाभूत सुविधा सीएसआर फंडाच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला . विद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी भरीव मदत निधी ग्रामस्थ्यांच्या सहकार्यातून मिळवून दिला, सौर ऊर्जा पॅनल, डिजिटल झेरॉक्स मशीन, विद्यालयाच्या मैदानात कच, खडी टाकून संपूर्ण मैदान सुशोभित करण्यात आले. संपूर्ण विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे, साऊंड सिस्टिम, स्वागत कमान सुशोभीकरण स्लाइडिंग गेट, बोलक्या भिंती त्यांची रंगरंगोटी इत्यादी महत्त्वाची कामे करण्यासाठी आजी-माजी विद्यार्थ्यांकडून मोठा मदत निधी मिळविला .
शासकीय सेवेत सचोटीने कार्य करत राहणे ही प्रामाणिक सेवावृत्ती जोपासल्यास प्रत्येकाला कर्तव्यपूर्तीचे समाधान लाभते. हेच समाधान सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सुखकर करून जाते अशी भावना शारदा मिसाळ यांनी व्यक्त केली .
मिसाळ दांपत्याने ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना हजारो विद्यार्थी घडविले, त्यांना यशाचा मार्ग दाखवला अश्या शब्दांत मान्यवरांनी याप्रसंगी भावना व्यक्त केल्या . प्रस्ताविक रवींद्र यांनी तर सूत्रसंचालन सुलक्षणा दुसाने व योगेश दुसाने यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button