धार्मिंकसांस्कृतिक

श्रीरामनवमी निमित्त शिरूर येथे संगीत गीत रामायण कार्यक्रम

भाविकांची मोठी उपस्थिती

गीत रामायण सादर करताना गायक वैभव मराठे
शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट -24)श्रीरामनवमी निमित्त समस्त नामदेव महाराज शिंपी समाज श्रीराम मंदिरात ओंकार संगीत विद्यालय शिरुर यांच्या वतीने संगीत गीत रामायणाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते .

‘ राम जन्मला ग सखे राम जन्मला , दशरथा घे पायसदान , स्वयंवर झाले सीतेचे, मोडू नका वचनास , जय जय गंगे , सेतू बांधा रे सागरी , लव कुश रामायणे गाती , चला पाहवया मिथिया नगरी , पराधीन आहे पुत्र मानवाचा , भूवरी रावण वध झाला , त्रिवार जयजयकार रामा , गा बाळांनो श्री रामायण यासह रामायणातील विविध प्रसंगावर आधारित गीते यावेळी  सादर करण्यात आली .
ओंकार संगीत विद्यालयाचे प्रमुख गायक वैभव मराठे, डॉ. समीर ओंकार,सुषमा झावरे , योग ताम्हाणे, सुषमा झावरे, ऋतवा जावळे ,रुदाणी झावरे वेदांत चव्हाण , आरुष पाटील ,अन्वय मापेडवार , आदींसह विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी गीते सादर केली. अंत्यत भक्तीभावाने भावस्पर्शी असे कार्यक्रमाचे निवेदन माजी मुख्याध्यापाक व्ही .डी कुलकर्णी यांनी केले. तबल्याची साथ संगत  सखाराम पुरी यांनी दिली .समस्त नामदेव शिंपी समाज ट्रस्ट शिरुरचे सिध्देश्वर बगाडे यांनी ओंकार संगीत विद्यालयाचे गायक वैभव मराठे यांनी दरवर्षी श्रीरामनवमीस संगीत गीत रामायण सादर करावे असे आवाहन केले . ओंकार संगीत विद्यालयातील गायक व वादक यांच्या यावेळी सन्मान करण्यात आला .
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , माजी नगराध्यक्षा उज्जवला बरमेचा, माजी नगराध्यक्षा सुवर्णा लंटाबळे , माजी नगरसेवक नीलेश लंटाबळे , समस्त नामदेव शिंपी समाज ट्रस्ट शिरुरचे सिध्देश्वर बगाडे , विवेक बगाडे, डॉ .शिल्पा घोडे , भाजपाचे नेते प्रवीण मुथ्था ,सनदी लेखापाल विशाल झावरे , व्यवसायिक आशिष जावळे , बालाजी विद्यालयाचे प्राचार्य विनायक म्हसवडे , व्यवसायिक पंकज बिहाणी ,माजी शिक्षिका संध्या कुलकर्णी , ॲड . विक्रम पाटील , ॲड संयोगिता पाटील आदी उपस्थित होते .कार्यक्रमाच्या शेवटी जय श्रीरामाचा जयघोष करण्यात आला .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button