शिरुर नगरपरिषदेचा सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षात ५ कोटी ९३ लाख रु.मालमत्ता कर तर पाणी पट्टी १ कोटी ६३ लाख रु .वसूल
शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम 24) शिरूर नगरपरिषदेने सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षात ५ कोटी ९३ लाख रु. ची घरपट्टी व १ कोटी ६३ लाख रु . ची पाणीपट्टी ३१ मार्च २०२५ अखेर वसूल करण्यात आली आहे .
याबाबत मुख्याधिकारी प्रीतम पाटील व अक्षय बन्नगिरवार यांनी सांगितले की शिरुर नगरपरिषदेत एकूण १४१२८ मालमत्ता आहेत . वाणिज्यची ३ कोटी ३२ लाख रु. वसुली झाली असून निवासी २ कोटी ६१ लाख रु.ची वसूली झाली आहे . यंदाच्या वर्षाकरीता मालमत्ता कर मागणी – १० कोटी १६ लाख रु .ची होता . त्यापैकी ५ कोटी ९३ लाख रु.ची करवसूली झाली आहे . तर पाणीपट्टी ४ कोटी ४५ लाख रु ची मागणी असताना १ कोटी ६३ लाख रु वसूल झाली आहे .
मालमत्ता कर संकलनासाठी ५ वसूली पथके नेमण्यात आली होती . दरम्यान कराचा भरणा न केल्याने ७२ नळ कनेक्शन कट करण्यात आली आहेत .डिसेंबर २०२४ पासून घरोघरी जाऊन कर भरणा करणे साठी जनजागृती करण्यात येत होती .१ एप्रिल २०२४ पासून ४ वेळा भ्रमणध्वनी वर कर भरणा करणे बाबत संदेश मालमत्ता धारकांना पाठविण्यात आले होते.
याखेरीज ऑनलाईन कर भरणा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती.नागरिकांच्या सोयी साठी जुनी नगरपालिका इमारत येथे भरणा केंद्र सुरू करण्यात आले होते
तसेच कर भरणा करणेबाबत कचरा घंटागाडी द्वारे व ऑटोरिक्षा द्वारे दवंडी देण्यात आली.
मार्च महिन्यामध्ये शासकीय सुट्टीच्या दिवशी व शनिवार व रविवार भरणा केंद्र नागरिकांच्या सुविधेसाठी सुरू ठेवण्यात आले होते.
