राष्ट्रीय
श्रीमती पानाबाई मांगीलाल लुंकड यांच्या संथाराव्रताची पूर्णाहूती
शोभायात्रा शुक्रवार दि ११ एप्रिल रोजी सकाळी साडे दहावाजता हुडको कॉलनी शिरुर येथून गोरक्षण पांजरापोळ येथे जाईल
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम २४)जुन्या पिढीतील हुडको कॉलनमधील श्रीमती पानाबाई मांगीलालजी लुंकड ( निमोणेकर ) वय ८७ यांचे निधन झाले .
त्यांनी संथाराव्रत धारण केले होते .
त्याच्या पश्चात दोन मुले , दोन विवाहित मुली , सूना नातवंडे असा परीवार आहे . पानाबाई लुंकड यांचा धार्मिक सामाजिक कार्यात पुढाकार असायचा .
व्यवसायिक दिपक लुंकड , पवन लुंकड , सौ.शोभा दिलीप धोका , सौ.ललिता पारसजी लुनावत यांच्या त्या आई होत . व्यवसयिक व सामाजिक कार्यकर्ते स्वर्गिय गोकुळचंदजी मुथा यांच्या त्या भगिनी होत .शोभायात्रा..
शुक्रवार दि.११|०४|२०२५ को सकाळी १०.३० वाहुडको काॅलनी , शिरुर येथील राहत्या घरापासून श्री गोरक्षण पांजरापोळ , जोशीवाडी , शिरुर येथे जाणार आहे .
