निधन वृत्त
जुन्या पिढीतील गुलाबराव चौधरी यांचे निधन
शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट 24 टीम )
जुन्या पिढीतील निमगाव म्हाळुंगी , ता . शिरुर येथील गुलाबराव नामदेवराव चौधरी वय -९० यांचे वृध्दापकाळाने निधन झाले .
गुलाबराव चौधरी हे प्रगतीशील शेतकरी व दुग्धव्यवसायिक होते. त्याच्या पश्चात पत्नी , एक मुलगा , २ विवाहित मुली , जावई ,सून नातवंडे असा परीवार आहे . सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी प्रकाश चौधरी यांचे ते वडिल होत .तर शिरुर येथील व्यवसायिक वैभव नारायण काळे यांचे ते आजे सासरे होत .
दशक्रिया विधी गुरुवार दि .१७ एप्रिल रोजी निमगाव म्हाळुंगी , ता . शिरुर, जि. पुणे येथे होणार आहे .
