विशेष

रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचा वतीने स्पंदन उपक्रम


शिरुर दिनांक ( वार्ताहर )
वाट चुकलेल्या अल्पवयीन मुलांकरीता रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी “स्पंदन” उपक्रमाचे आयोजन” केल आहे .
याबाबत सविस्तर माहिती देताना पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले की एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर औ‌द्योगीक वसाहत असल्याने कामगारांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. अल्पवयीन मुले गुन्हेगारी मार्गावर जावू नयेत तसेच ज्या अल्पवयीन मुलांविरुध्द यापुर्वी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत अशा अल्पवयीन मुलांना रोजगार मिळून देण्यासाठी “मिशन परिवर्तन” मार्फत पुणे ग्रामीण पोलीस व कला, क्रिडा, साहित्य शांतीदूत परिवार आयोजित “स्पंदन” उपक्रम रांजणगाव पोलीस स्टेशन कडुन सुरु करण्यात आला आहे.
या उपक्रमामध्ये पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील विधीसंघर्षीत बालके व त्यांचे संपर्कातील इतर अल्पवयीन असलेल्या २० ते २५ मुलांनी सहभाग घेतला होता. उपक्रमा अंतर्गत सदर अल्पवयीन मुले ही गुन्हेगारी कृत्याकडे न वळता त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
सदरचे अल्पवयीन मुले ही स्वंत:चे पायावर उभे राहण्यासाठी व स्वंत: मधील कलागुणांची ओळख करुन देण्यासाठी मुलांना पोलीस निरीक्षक –महादेव वाघमोडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, अल्पवयीन मुलांनी गुन्हेगारी मार्गा वरती न जाता स्वंत:ची ताकत ओळखून आपल्यातील कौशल्य ओळखून त्यांना योग्य वेळी योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे,. या मुलांना रांजणागव पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करुन त्यांच्या कलागुणांना वाव देवुन त्यांना एमआयडीसी मध्ये रोजगाराची संधी मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच मिशन परिवर्तनचे कला, क्रिडा, साहित्य शांतीदुत परिवार चे अध्यक्ष योगेश जाधव सचिव तथा प्रशिक्षक अनिता राठौड यांनी देखील मुलांचे समुपदेशन करुन त्यांना नॅपकिन , रुमालाचा वापर करुन फुलांचा गुच्छ, बुके, घड्‌याळे, माळा इ. गृहउपयोगी व शोभेच्या वस्तु कमीत कमी खर्चामध्ये तयार करुन त्यांची विक्री करून रोजगार उभा करण्यासाठीचे प्रात्यक्षिक दाखवून मुलांना वेगवेगळ्या उ‌द्योग व व्यवसायाचे करण्याचे प्रशिक्षण दिले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. तुषार दसगुडे यांनी केले.
प्रशिक्षणासाठी आलेले अल्पवयीन मुलांसोबत त्यांचे नातेवाईक, आई-वडील यांनी देखील रांजणगाव एमआयडीसी पोलीसांचे व मिशन परिवर्तनेचे अधिकारी, पदाधिकारी यांचे आभार मानले असुन त्यांचे मुले यापुढे कोणत्याही गैरकृत्यामध्ये सहभागी होणार नाहीत व समाजमध्ये कष्टाने व स्वाभिमानाने जगतील असे सांगितले. तसेच अल्पवयीन मुलांनी देखील पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना यापुढे कोणत्याही प्रकाराचा गुन्हा करणार नाही असे अश्वासन दिले आहे.
रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी आयोजित केलेल्या “स्पंदन” उपक्रमामुळे दिशाहिन झालेल्या अल्पवयीन मुलांना योग्य दिशा देवुन रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असुन त्यासाठी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, कला, क्रिडा, साहित्य शांतीदूत परिवार अध्यक्ष योगेश जाधव , अनिता राठौड व रिड इंडीया चे ॲड . तुषार दसगुडे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button