Uncategorized

अज्ञात चोरट्याने तब्बल ५०,००० हजार रु . किंमतीच्या अ‍ॅल्युमिनियम तारा चोरल्या!

 शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -24) – शिरूर तालुक्यातील चांडोह गावच्या हद्दीत अज्ञात चोरट्याने लाईटच्या खांबावरील अंदाजे ५०,००० रुपये  किंमतीच्या अ‍ॅल्युमिनियमच्या १५०० मीटर लांबीच्या पांढऱ्या रंगाच्या तारा चोरल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी श्री. हेमराज राजाराम गुजर (वय ३५, व्यवसाय ठेकेदार, रा. लाखनपूर, जि. दोसा, राजस्थान – सध्या रा. चांडोह, शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
 ही चोरी ता. २० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६:३० ते २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ८:३० या वेळेत घडली असून, अज्ञात चोरट्याने रोडच्या कडेच्या लाईटच्या खांबावरील तारा मुद्दाम लबाडीने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
 या प्रकरणी शिरूर पोलीस ठाणे गु.र.नं. ५३४/२०२५, भा.दं.वि. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस हवालदार वारे हे करत आहेत.

अतुल बोथरा यांना डेली न्यूज पोस्ट टीम -२४ चा वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button