विशेष
१४ लाख रुपये किमंतीच्या मातीचे उत्खणन
खाण आणि खनिज (नियमन आणि विकास) अधिनियम १९५७ -- ४ अ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ -- ९,१५ नुसार गुन्हा दाखल
शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम )कोळगाव डोळस , ता . शिरुर येथे अज्ञात चोरट्याने १४ लाख १७ हजार ८० रु . किमंतीची १६८७ ब्रास काळी माती चोरुन नेली आहे . याबाबत खाण आणि खनिज (नियमन आणि विकास) अधिनियम १९५७ — ४ अपर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ — ९,१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामसभा आधिकारी हर्षद बाळासाहेब साबळे वय २९ वर्ष सध्या राहणार – बाबुराव नगर शिरूर ता शिरूर जि. पुणे मूळ रा.पारगाव सुद्रिक तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांनी अज्ञात चोरटा विरोधात फिर्याद दिली आहे .

१ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११ ते दि. ५ एप्रिल २०२५ रोजीच्या दरम्यान कोळगाव डोळस ता शिरूर जि. पुणे येथील जमीन गट नंबर ११७ यामधील १४ लाख १७ हजार ८० रु किमंतीची १६७८ ब्रास काळी माती 

अज्ञात चोरट्याने स्वंत: च्या आर्थिक फायद्यासाठी जे.सी.बी व हायवा या साधनाने गौण खनिजाचे उत्खनन करून शासनाची कोणतीही परवानगी न घेता चोरी करून नेली आहे .
याबाबत आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत .


