शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर शिरूरच्या विधी विनोद बोथरा यांनी सनदी लेखापाल (सीए) अंतिम परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
त्यांच्या या यशामुळे शिरूर शहरासह व्यापारी, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



