धार्मिंकविशेष

थापलिंग पालखी सोहळाचे शिरुर येथे उत्सहात स्वागत

oplus_131074

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)ज्ञानोबा माउली तुकारामचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात वळती (ता. आंबेगाव) येथून निघालेल्या श्रीक्षेत्र थापलिंग पायी दिंडी सोहळ्याचे शिरुर येथे मोठ्या उत्सहात स्वागत करण्यात आले .
श्रीक्षेत्र थापलिंग दिंडी सोहळ्याचे हे यंदाचे तेरावे  वर्ष आहे. वळती येथून निघालेली दिंडी रामलिंग हून शिरुर शहरात आली शिरुर गोलेगाव रोड वर माजी केंद्रप्रमुख बबनराव थोपटे ,शिक्षक नेते संतोष थोपटे व प्रा . किशोर थोपटे यांच्या परीवाराचा वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले .

oplus_131074

यावेळी थोपटे यांच्या निवासस्थानी दिंडी सोहळा नाष्टा साठी थांबला . इडली सांबार व शिराचा नाष्टा वारक-यांना देण्यात आला .
दिंडी सोहळाचा वतीने संतोष थोपटे व किशोर थोपटे यांच्या सन्मान करण्यात आला .
दिंडी सोहळा तर्डोबाचीवाडी, निमोणे, गुनाट, इनामगाव, देऊळगाव राजे, पळसदेव, इंदापूर, मार्गे पंढरपूरकडे जाणार आहे .
यावेळी नितीन महाराज झंजाड ज्ञानेश्वर क्षीरसागर , ,अजित लोखंडे सुभाष ढवळे , आदी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button