विशेष

गणेशोत्सवानिमित्त शिरूर येथे महिलांना मोफत दूध व मिठाई वाटप

  शिरूर येथे महिलांना मोफत दूध व मिठाईवाटपाचा उपक्रम

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -२४) – शिरूर येथील वात्सल्य सिंधू फाऊंडेशन आणि त्रिमूर्ती गणेश मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवानिमित् शिरूर शहरातील महिलांना मोफत दूध व मिठाई वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

 रेव्हन्यू  कॉलनी येथे आयोजित या कार्यक्रमास पु.ना. गाडगीळ अँड सन्सशिरूर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.या उपक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  पु.ना. गाडगीळ अँड सन्सचे शाखा व्यवस्थापक नितीन बेल्हेकर, आम्ही शिरूरकर  फाउंडेशनचे रवींद्र सानप, वात्सल्य सिंधू  संस्थेचा  अध्यक्षा सुनंदा लंघे, उपस्थित होते.मंडळाचे अध्यक्ष सार्थक गायकवाड, जयश्री , ऋषिकेश म्हस्के आदी  उपस्थित होते .

 महिलांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी व पौष्टिक आहाराविषयी जनजागृती करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती उषा वाखारे यांनी  दिली.

 नितीन बेल्हेकर यांनी या उपक्रमास शुभेच्छा देताना सांगितले की महिलांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या उपक्रमात आम्ही नेहमी सहभाग घेऊ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button