राष्ट्रीयविशेष

अनंत अडचणींवर मात करत केतन बो-हाडे बनले सी ए .( सनदी लेखापाल )


शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम )
अनंत अडचणींवर व संकटावर अभ्यास व जिद्दीने मात करीत बो-हाडे मळा , ता.शिरुर येथील केतन संजय बोऱ्हाडे या विद्यार्थ्याने सी ए . ( सनदी आधिकारी ) ची फायनल परीक्षा उत्तीर्ण होत . सी ए बनण्याचे स्वप्न साकार केले आहे .
त्याच्या यशाबद्दल परिसरात मिरवणूक काढून आनंद व्यक्त करण्यात आला .
केतन याने सांगितले की मी सी . ए . व्हावे हे केवळ माझं स्वप्न नव्हतं, तर माझ्या आई-वडिलांचही स्वप्न होत. ते साकार करु शकलो . स्वप्न साकार करण्याचा आनंद शब्दांत मांडणं कठीण आहे. सी ए होण्याचा प्रवास खूप कठीण व खडतर होता, पण जिद्दीच्या जोरावर मी हे शक्य केलं.
मधल्या काळात वडिल संजय यांचे अकस्मात निधन झाल्याने कुटुंबाचा आधार गेला. खूप दु :ख झाले पण या दु:खातून सावरत आई वडिलांचे सी ए चे स्वप्न साकारण्याकरीता पाच वर्ष सातत्याने नियमित अभ्यास करत सी .ए. ची अवघड परीक्षा उत्तीर्ण केली .
केतनचे पाचवी ते दहावी चे शिक्षण रयत शिक्षण संस्था शिरूर या ठिकाणी झाले व पदवीचे शिक्षण शिरुर मधील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात झाले. 2019 साली मी सी ए . फाउंडैशन ची परीक्षा केतन ने दिली पण त्यात तो अपयशी झाला . परंतु दुसऱ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण झाला . 2022 साली सीए इंटरमेडीटेड ही परीक्षा उत्तीर्ण झाला . सी ए फायनल चे ऑनलाईन क्लास व 3 वर्षांची सीए ची इंटरशिप शिरुर येथील सनदी लेखापाल सुनील येल्लोळ यांच्या फर्म मध्ये केतनने पूर्ण केली. सन -२०१९ साली पाहिलेले स्वप्न 2025 मध्ये सत्यात उतरवत केतनने सी ए चे स्वप्न साकार केले . परीक्षेच्या कालावधीत आधी 5 महिने केतन दररोज सकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत अभ्यास करत . यशाचा या प्रवासात अनेक अडचणी आल्या, अनेक वेळा थकलो, पण कधीही हार मानली नाही. माझ्या आई-वडिलांनी आणि गुरूजनांनी नेहमीच पाठिंबा दिला आणि प्रोत्साहन दिलं.
मी आज जे काही साध्य केलं आहे, ते माझ्या कठोर परिश्रमांचे, आई-वडिलांच्या आशीर्वादाचे आणि माझे कुटूंबातील प्रत्येक व्यक्ती व माझा मित्र परिवार व शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फळ आहे. हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे. मी यापुढेही प्रामाणिकपणे काम करून माझ्या कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करेन असे केतन यांनी सांगितल .
माजी उपसरपंच बाबाजी वर्पे , भरत बो-हाडे , संजय शिंदे यांनी केतन याचे यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button