विशेषशैक्षणिक

शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचा उपाध्यक्षपदी स्वाती प्रकाश थोरात

शिरूर, दि. — (डेली न्यूज पोस्ट-24)
शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत  आमदाबाद ,ता .शिरुर येथील पांडुरंगअण्णा थोरात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती प्रकाश थोरात यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर रामदास थिटे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.

सौ. थोरात या शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय असून, विविध शैक्षणिक नवकल्पनांच्या अंमलबजावणीसाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत.

या निवडीबद्दल तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी  थिटे व थोरात यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button