
हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या वतीने गणेश जयंती निमित्त दरवर्षी ३००० हून आधिक भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते .

शिरुर शहरात धार्मिक , सामाजिक , पर्यावरण व शैक्षणिक उपक्रम मंडळाचा वतीने सातत्याने राबविण्यात येतात . शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार , गणेशोत्सवात महिलांसाठी महाआरती , शालेय विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप , कोरोना काळात गरजूना अन्न वाट्प , या खेरीज वृक्षारोपन या सारखे विविध उपक्रम मंडळ राबविते . पुणे ग्रामीण पोलीसांच्या वतीने ही मंडळाच्या सन्मान करण्यात आलेला आहे.






