राष्ट्रीय
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा विजयादशमी निमित्त चा कार्यक्रम शिरूर येथे संपन्न
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -२४}
हिंदुत्व हे व्यापक असून हे व्यापक हिंदूत्व लोकांपर्यत पोहोचवावे लागेल.त्याच बरोबर समाजात फूट पाडणा-यांचा विरोधात लढावे लागेल असे पश्चिम महाराष्ट्र प्रचार विभाग प्रमुख अतुल अग्निहोत्री शिरूर येथे म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव शिरूर नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात अत्यंत उत्साह, आनंद आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला ५०० हुन अधिक नागरिक व स्वयंसेवक सपरिवार उपस्थित होते.

या वर्षी संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असून संघ १०१ व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात शस्त्रपूजन व ध्वजवंदनाने झाली.
यावेळी बोलताना अग्निहोत्री यांनी संघ स्थापनेचा इतिहास, प्रचारकांचा त्याग, स्वातंत्र्ययुद्धातील संघाचा सहभाग तसेच संघावरील बंदीचा कालखंड यांचा उल्लेख केला.
त्यांनी पंच परिवर्तन, नागरी शिष्टाचार, स्वबोध, भारतीय कुटुंब व्यवस्था आणि समाज म्हणून देशाप्रती आपली भूमिका या विषयांची मांडणी केली.
त्यांनी पंच परिवर्तन, नागरी शिष्टाचार, स्वबोध, भारतीय कुटुंब व्यवस्था आणि समाज म्हणून देशाप्रती आपली भूमिका या विषयांची मांडणी केली. जागतिक स्तरावरील सध्याच्या परिस्थितीचा संदर्भ देत सांगितले की, अमेरिकेच्या टॅरिफ आक्रमणासमोर आणि कोविड काळातील आव्हानात्मक परिस्थितीत भारताने निभावलेली भूमिका उल्लेखनीय होती.
पाकिस्तानविरुद्धच्या युद्धातील ऑपरेशन सिंधुर दरम्यान भारताने प्रदर्शित केलेल्या आत्मनिर्भरतेच्या शक्तीची झलक संपूर्ण जगाने पाहिली.
पाकिस्तानविरुद्धच्या युद्धातील ऑपरेशन सिंधुर दरम्यान भारताने प्रदर्शित केलेल्या आत्मनिर्भरतेच्या शक्तीची झलक संपूर्ण जगाने पाहिली.कुटुंब प्रबोधन ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, “भारताचा प्राण हा धर्म आहे. जो सर्वांना धारण करतो तोच धर्म,” असे नमूद करत धर्माचा व्यापक अर्थ समजून घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. सर्वांचे मूळ हे हिंदूच असून हिंदुत्व ही कोणती संकुचित विचारसरणी नसून अत्यंत व्यापक जीवनदृष्टि आहे, असे ते म्हणाले. संघाच्या शताब्दी निमित्ताने आपण सज्जन शक्ती म्हणून कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

संघ समजून घेण्यासाठी डॉ. हेंगडेवार यांच्या चरित्राचा अभ्यास करावा.भारताची एक संस्कृती आहे. व या संस्कृतीने कधी कोण्यावर आक्रमण केले नाही.या देशात १० हजाराहून अधिक काळ एक संस्कृती नांदत होती. भारतात सर्व पंथाना सामावून घेण्यात आले. मानवता धर्माचे नाव हिंदू धर्म आहे. हिंदुत्व हे समजून घेतले पाहिजे.

संघाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड अवहेलना उपेक्षा सहन केली असल्याचे ते म्हणाले.
बळकट कुटुंब व्यवस्था अनेक प्रश्ननांचे उत्तर आहे. भारत हा धर्मप्राण देश आहे.
आम्ही हे विसरता कामा नाही.
हिंदुत्व हे व्यापक असून हे व्यापक हिंदूत्व लोकांपर्यत पोहोचवावे लागेल. समाजात फूट पाडणा-यांचा विरोधात स्वयंसेवक लढतील असे ते म्हणाले.

डॉ. योगेश सुभाष उपलेंचवार यांनी आपल्या भाषणात संघाच्या कार्याची दिशा, संघटनाचे महत्त्व आणि शताब्दी वर्षात प्रवेश हा सर्वांसाठी अभिमानास्पद क्षण असल्याचे नमूद केले. “मी बालपणापासून संघ संपर्कात आहे,” असे सांगत त्यांनी शाखेचे स्वसंरक्षण व बौद्धिक विकासातील महत्त्व अधोरेखित केले.

या प्रसंगी शिरूर तालुका संघचालक दत्तात्रय केशव धोंगडे तसेच पुणे विभाग संघचालक संभाजी गणपतराव गवारे उपस्थित होते.
